पाचोरा – भडगाव तालुक्यांच्या ग्रामीण विकासासाठी अडिच कोटींचा निधी मंजुर – आ. किशोर पाटील

पाचोरा ( प्रतिनिधी ) पाचोरा भडगाव तालुक्यांतील ग्रामीण भागात गावांतर्गत सुविधा पुरवण्यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री ना. भुसे यांनी आ. किशोर पाटील यांच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याला प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे.

पाचोरा भडगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधांचा अनुशेष भरून काढण्यासाठी आ. किशोर पाटील यांनी शासनाकडे प्रस्ताव दाखल करून ना. दादाजी भुसे यांची वारंवार भेट घेऊन त्यांच्या दालनात बैठक घेऊन पाचोरा भडगाव तालुक्याचा ग्रामीण भाग मूलभूत सुविधांपासून वंचित आहे हे लक्षात आणून दिले, त्यानुसार या वर्षासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी खालील गावांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

या निधीतून करण्यात येणार असलेली कामे – होळ येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे रक्कम ५ लक्ष, आखतवाडे येथे स्मशानभूमी रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष, अंतुर्लि खु प्र.पा. नं.3 येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ३ लक्ष, आंबे वडगाव येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष, पिंपळगाव हरेश्वर येथे खुले सभागृह बांधकाम करणे ५ लक्ष, शिंदाड़ येथे अरुण पाटील यांच्या घरापासून ते सुरेश त्र्यंबक पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष, सार्वे बु प्र पा (सातगाव डोंगरी) येथे खुले सभागृह बांधकाम करणे ६ लक्ष, कुरंगी कसाइ वाडा येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष, निंभोरी बुद्रुक येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष, निंभोरी खुर्द येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष, वाणेगाव कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष, पाहाण येथे स्मशानभूमी बांधकाम करणे ५ लक्ष, हडसन रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 3 लक्ष, वडगाव (हडसन) येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ३ लक्ष, दूसखेडा येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ३ लक्ष, पिंपरी डांभूर्णी रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ३ लक्ष,पिंपरी बु प्र भ (कजगाव) रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, खाजोळा येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष, लासुरे येथे खुले सभागृह बांधकाम करणे ६ लक्ष, वलवाडी ता.भडगाव येथे वॉल कंपाऊंड करणे ५ लक्ष, बाळद खुर्द ता.भडगाव येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष, वडजी ता.भडगाव येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५लक्ष, शिवनी ता.भडगाव येथे स्मशानभुमी रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष, बांबरुड प्र.भ. ता.भडगाव येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष, निंभोरा ता.भडगाव येथे खुले सभागृह बांधकाम करणे 7 लक्ष, कोठली ता.भडगाव येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष, महिंदळे ता.भडगाव येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष, पेंडगाव ता.भडगाव येथे खुले सभागृह बांधकाम करणे ६ लक्ष, देव्हारी ता.भडगाव येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ३ लक्ष, मळगाव ता.भडगाव येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ३ लक्ष, संगमेश्वर येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष, वडगाव मुलाने येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ३ लक्ष, बाळद ता.पाचोरा येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करण करणे ५ लक्ष, मोहलाई येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ३ लक्ष, पिंपळगाव खुर्द ता. पाचोरा येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ३ लक्ष, पूनगाव रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष, तारखेडा बुद्रुक येथे बौद्ध वस्तीत खुले सभागृह बांधणे ५ लक्ष, तारखेडा खुर्द येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष, डोंगरगाव येथे खुले सभागृह बांधकाम करणे 7 लक्ष, जारगाव येथे नाथ मंदिरापासून ते गावात जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 7 लक्ष, नगरदेवळा येथे स्मशानभुमी रस्ता कॉंक्रिटीकरण करणे बैठक व्यवस्था करणे पेव्हर ब्लॉक बसविणे 12 लक्ष, नगरदेवळा वार्ड नंबर 3 येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ३ लक्ष, नगरदेवळा वार्ड नंबर 2 ओपन जागेला वॉल कंपाऊंड करणे ८ लक्ष, नगरदेवळा येथे खुले सभागृह बांधकाम करणे ७ लक्ष.वाडी (शेवाळे) येथे हिंदू स्मशानभूमी पेव्हर ब्लॉक बसविणे ३ लक्ष,वाडी (शेवाळे) येथे खुले सभागृह बांधकाम करणे ७ लक्ष, घुसर्डी ता.भडगाव येथे खुले सभागृह बांधकाम करणे ६ लक्ष. वरिल गावांना विकासकामें होणार असून गावाच्या सुधारणा व सौंदर्यात भर पडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून आमदार किशोर आप्पा पाटील यांचे अभिनंदन केले असून आभार देखील व्यक्त करीत आहेत.

Add Comment

Protected Content