जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहर पोलीस ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गलंगी गावाजवळून अटक केली आहे. त्याच्याकडून ५ हजार ७०० रुपयांची रोकड जप्त केली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सुलतान खालीद पिंजारी (वय-२७) रा. इस्लामपुरा दोंडाईचा, जि.धुळे असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात संशयित आरोपी सुलतान पिंजारी हा फरार झालेला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार असल्याने जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोउनि अनिल जाधव, पाहेकॉ, निलेश सोनवणे, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, प्रदीप चवरे यांनी कारवाई करत संशयित आरोपी सुलतान पिंजारी याला शिरपूर रोडवरील गलंगी गावाजवळून अटक केली. त्याचा जवळून ५ हजार ७०० रुपये रोकड जप्त केली आहे. पुढील कारवाईसाठी सुरक्षित आरोपीला चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.