जळगावात केसीई महाविद्यायातर्फे वृक्षारोपण

 

 

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालयात रासेयो विभागाच्यावतीने वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे हे अध्यक्ष्स्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कबचौउमवि विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील व अभय महिला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. व्ही.एल.पाटील हे उपस्थित होते. यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.प्रविण कोल्हे व महिला विभाग प्रमुख डॉ.वंदना चौधरी यांनी केले.यावेळी उपप्राचार्य-डॉ.केतन चौधरी, विभाग प्रमुख-प्रा.निलेश जोशी, प्रा.पंकज पाटील, प्रा.अतुल गोरडे, मोहन चौधरी, विजय चव्हाण, केतन पाटील, शरद सोनार हे उपस्थित होते.

Protected Content