प्राणघातक हल्ल्याच्या आरोपातून ग्रामसेवकासह दोघांची निर्दोष मुक्तता

जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील इसमावर प्राणघातक हल्ला केल्याच्या खटल्यात ग्रामसेवकासह दोघा संशयितांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

 

तांबोळे, बु।।, चाळीसगाव येथील संजय दयाराम जाधव हा दि.०६-०४-२०१४ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास   सम्राटनगर, चाळीसगाव भागात राहाणाऱ्या त्याचा मामा शिवाजी विक्रम सुर्यवंशी याच्या घरी मोटारसायकलीने जात होता. तो अभिनव हायस्कूलजवळून सम्राटनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने जात असताना आरोपी ग्रामसेवक संभाजी बाबुराव जाधव व त्यांचेसोबतचा बंडू लहू काळे, तसेच एक अनोळखी ईसम या तिघांनी त्याची गाडी थांबवली व ते तिघे त्याला म्हणाले की, तु आमच्या अंगावर गाडी का घातली? या कारणावरून संजय जाधव यास त्याच्या मोटारसायकलवरून खाली ओढले व त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बंडु लहू काळे व त्याचेसाबतचा अनोळखी इसम या दोघांनी त्याचे दोन्ही हात पकडले आणि संभाजी जाधव यांनी त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूसारखे तीक्ष्ण हत्याराने त्याच्या पोटात डावे बाजूस भोसकून त्याला गंभीर जखमी केले.

 

त्यावेळी संजय जाधव याचा मामा शिवाजी सुर्यवंशी, सुमीत अशोक भोसले, राहूल धर्मा पवार व राकेश सुनील गायकवाड असे धावत आले. त्यांना पाहून तिनही हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर जखमी अवस्थेत संजय जाधव याला त्याच्या मामाने व ईतरांनी चाळीसगांव येथील डॉ. जयवंत देवरे यांच्या दवाखान्यात दाखल केले, अशी फिर्याद जखमी संजय दयाराम जाधव याने चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल केली. त्या फिर्यादीवरून पोलिसांनी गु.र.नं.१०४/२०१४ नुसार भादंवि कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

.

सदर खटला चौकशीचे वेळी सरकार पक्षातर्फे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शिवाजी विक्रम सुर्यवंशी, सुमीत अशोक भोसले, राहूल धर्मा पवार, डॉ. जयवंत देवरे, फिर्यादी संजय जाधव याचा मृत्यूपुर्व जबाब नोंदविणारे तहसीलदार नानासाहेब आगळे, जप्तीपंच, घटनास्थळपंच तपासाधिकारी पीएसआय अरविंद देवरे  यांचेसह एकुण अकरा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या जबानीतील तफावतीं, अविश्वासार्हता आणि तपासकामातील तृटीं या सर्व बाबींचा विचार करून जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश-४  एस. जी. ठुबे यांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

 

आरोपींतर्फे ॲड. वसंत आर ढाके यांनी बचावाचे काम केले. त्यांना ॲड. प्रसाद व्ही ढाके, ॲड. निरंजन ढाके, ॲड. सौ. भारती व्ही. ढाके, ॲड. उदय खैरनार, ॲड. शाम जाधव यांनी सहकार्य केले.

Protected Content