अॅन्टीजन तपासणी केंद्राची विनामुल्य सेवा सुरु

  

जळगाव, प्रतिनिधी ।   जळगाव, प्रतिनिधी ।   सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  महापालिका आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी  यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड -१९ अॅन्टीजन तपासणी केद्र  सानेगुरुजी वाचनालय येथे  सुरु करण्यात आले.  या तपासणी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी महापौर सौ, जयश्रीताई महाजन,  जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, महापालिकेचे आयुक्त  सतीश कुलकर्णी,   रेडक्रॉसचे उपाध्यक्ष  गनी मेमन, मानद सचिव  विनोद बियाणी, जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा उपस्थित होते.

 

संपूर्ण कोरोना काळात रेडक्रॉसने सामाजिक भावनेतून अतिशय उत्कृष्ठ सेवा दिली असून अजूनही सर्व पदाधिकारी व कर्मचारी सेवा देत आहेत अशा शब्दात  आयुक्त  सतीश कुलकर्णी यांनी रेडक्रॉसचे कौतुक करत आभार व्यक्त केले.हे तपासणी केंद्र शहराच्या मध्यभागी म्हणजेच महापालिका संचलित सानेगुरुजी वाचनालयातील टेबल टेनिस हाॅल,शासकीय रुग्णालयाच्या मागे सुरु झाले असून तपासणी पूर्णपणे विनामूल्य आहे.  सद्य परिस्थितीत शासकीय यंत्रणेवर खूप मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे आणि रुग्णांची तपासणी लवकर झाल्यास उपचार लवकर करणे शक्य होईल. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हाधिकारी. अभिजीत राउत यांच्या मार्गदर्शनाने आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सहकार्याने या केंद्रात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सेवा देण्यात येत आहे. तसेच रविवारी देखील हि सेवा नागरिकांसाठी सुरु राहणार आहे. या तपासणी केंद्राचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन माननीय जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी केले आहे. दरम्यान,  रेडक्रॉस भवन येथील लसीकरण केंद्र हे सोमवार दि.- २९ मार्च रोजी सुरु असणार आहे.

 

Protected Content