जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील माहेर व सासर असलेल्या विवाहितेने पतिविरोधात कौटुंबिक वाद म्हणून खावटी मिळावी अशी मागणी केली आहे. केसबाबत जळगाव जिल्हा न्यायालयात सुनावनीचे कामकाजासाठी आलेल्या पती व पत्नी यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांमध्ये न्यायालयाच्या आवारातच तुफान हाणामारी झाल्याची घटना बुधवारी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता घडली. यामध्ये पती जखमी झाला असून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शनीपेठ परिसरातील माहेर असलेल्या विवाहिता यांनी कौटुंबिक वाद निर्माण झाल्याने त्यांनी आपल्या फातेमा नगरात राहणारे पती विरोधात जळगाव जिल्हा न्यायालयात खावटी मिळावी यासाठी दावा दाखल केला आहे. गेल्या सहा वर्षापासून पती न्यायालयात हजर राहत नव्हता. त्यामुळे विवाहितेला अर्थीक चणचण भासवत होती. बुधवारी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी जळगाव जिल्हा न्यायालयात तारखेवर आल्या असता त्यांना त्यांचा पती दिसला. त्यांनी त्यांच्या पतीला न्यायालयात पकडल्याने दोन्ही परिवारांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या हाणामारीत पती गंभीर जखमी झाला असून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे.