अमळनेरच्या क्रीडा संकुलास लवकरच निधी उपलब्ध करून देणार- मंत्री गिरीश महाजन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मारवड रस्त्यावरील क्रीडा संकुलाचे काम निधीअभावी रखडले असल्याने तातडीने अधिकाऱ्यांना पाहणीसाठी पाठवून राहिलेल्या कामासाठी लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अमळनेर येथे भाजपातर्फे आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी दिली. माजी आ.स्मिता वाघ यांच्या मागणीवर ना. महाजन यांनी वरील वक्तव्य केले.

यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते अनेकांचा भाजप प्रवेश पार पडला. मंत्री पदी विराजमान झाल्यानंतर ना गिरीश महाजन यांचे प्रथमच अमळनेर नगरीत आगमन झाल्याने त्यांच्या उपस्थितीत बन्सीलाल पॅलेस येथे बैठक तथा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी मंचावर माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा स्मिता वाघ,माजी आ डॉ बी एस पाटील यासह पदाधिकारी उपस्थित होते.सत्कार सोहळ्यानंतर सुरवातीला स्मिता वाघ यांनी क्रीडा संकुलासह निम्न तापी पाडळसरे धरणासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाला केंद्राच्या हिस्स्याच्या निधीसाठी पत्रच दिले नसल्याने निधी उपलब्ध होऊ शकला नाही परिणामी धरणाचे काम अपूर्ण राहिले यासाठी तातडीने पत्र देण्याची मागणी स्मिता वाघ यांनी करीत तालुक्यात इतर कामासाठी देखील निधी मिळावा अशी विनंती ना.महाजन यांच्याकडे केली.

सत्काराला उत्तर देताना ना.महाजन म्हणाले की अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर लवकरच येथील क्रीडा संकुलास भरघोस निधी मिळून राहिलेले काम पूर्ण केले जाईल,तसेच पाडळसरे धरणास केंद्राच्या हिस्स्याचा निधी मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून केंद्राला पत्र देण्याची व निधी ही उपलब्ध करण्याची व्यवस्था केली जाईल,याशिवाय ग्रामविकास खाते माझ्याकडे असल्याने माझ्याकडेच असल्याने या खात्या अंतर्गत जेवढा निधी देता येईल. तेवढा जास्तीतजास्त निधी या मतदारसंघात नक्कीच दिला जाईल, अशी ग्वाही देऊन आगामी जि.प. ,पं.स., नगरपालिका, बाजार समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वांनी एकजूट होऊन कामाला लागावे कोणत्याही परिस्थितीत या संस्थांवर भाजपचाच झेंडा फडकला पाहिजे असे आवाहन ना.महाजन यांनी कार्यकर्त्यांना केले. व शेवटी संघटनात्मक बाबींवर कार्यकर्त्यांशी संवादही साधला.

यावेळी राष्ट्रवादीच्या जि. प. सदस्य दहिवद येथील सौ मीनाबाई रमेश पाटील यांचा भाजप प्रवेश झाला,याशिवाय माजी नगराध्यक्ष सुभाष हरचंद चौधरी व भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष भरतसिंग पाटील यांचा राष्ट्रवादीतून पुन्हा स्वगृही भाजपा प्रवेश झाला.तसेच भाजपा युवा मोर्चा मध्ये माजी नगरसेवक नरेंद्रसिह ठाकूर यांचे सुपुत्र हर्षल ठाकूर यांनी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.सर्वांचे ना गिरीश महाजन यांनी पक्षात स्वागत केले.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील, ऍड व्ही.आर. पाटील, युवा मोर्चा प्रदेश सचिव भैरवी वाघ, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, विधानसभा क्षेत्र शितल देशमुख, माजी सभापती श्‍याम आहिरे, प्रफुल्ल पवार, भिकेश पाटील, बाळासाहेब पाटील, सरचिटणीस जिजाबराव पाटील, राहुल पाटील, राकेश पाटील, विजय राजपूत, मीनाताई पाटील, संगीताताई भिल, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुनीता पाटील, संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, माजी तालुकाध्यक्ष भरत पाटील, सरपंच संघटना तालुका अध्यक्ष महेंद्र बोरसे, मार्केट संचालक सदा बापू, राहुल पाटील, किरण पाटील, महेश पाटील, दिलीप ठाकूर, बापू हिंदुजा, दिलीप पाटील, महेंद्र पाटील, जिजाबराव पाटील, संजय पाटील, देवा लांडगे, युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी राजपूत, पंकज भोई, महिला मोर्चा अध्यक्ष छाया भामरे, कविता जाधव, राहुल चौधरी, समाधान पाटील, कल्पेश पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content