विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलतर्फे कासोदा येथे शिबिर

vighnaharta super speciality hospital pachora

पाचोरा प्रतिनिधी । येथील विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलतर्फे कासोदा येथे मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या माध्यमातून पाचोर्‍यासह परिसरातील ग्रामीण भागातील जनतेला अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध झालेली आहे. येथे विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून बहुतांश उपचार मोफत उपलब्ध असल्यामुळे परिसरातील जनतेचा या हॉस्पीटलचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. यातच पाचोर्‍यापासून थोड्या जास्त अंतरावर असणार्‍या रूग्णांनाही याचा लाभ व्हावा या हेतूने हॉस्पीटलतर्फे ठिकठिकाणी मोफत रोगनिदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते. या अनुषंगाने कासोदा (ता. एरंडोल ) येथे २३ जून रोजी भव्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हाजी एन.एम. सैंयद उर्दू विद्यालयात हे शिबिर होणार असून यात विविध तज्ज्ञ डॉक्टर्सतर्फे रोग निदान केले जाणार आहे. यातील रूग्णांवर नंतर विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलतर्फे उपचार करण्यात येतील. या शिबिरात २डी इकोसह अनेक महत्वाच्या चाचण्यांच्या माध्यमातून रोगनिदान केले जाणार आहे. याचा परिसरातील जनतेेने लाभ घेण्याचे आवाहन विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे संचालक डॉ. भूषण मगर आणि डॉ. सागर गरूड यांनी केले आहे.

Protected Content