Home धर्म-समाज सामान्य ज्ञान स्पर्धा बक्षीस वितरण व मान्यवरांचा गुणगौरव सोहळा संपन्न

सामान्य ज्ञान स्पर्धा बक्षीस वितरण व मान्यवरांचा गुणगौरव सोहळा संपन्न

0
86


पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भगवान महावीर, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने खुल्या सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन शिवसेना व युवासेना यांनी केले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण व मान्यवरांचा गुणगौरव सोहळा पार उत्सहात पार पडला.

 

सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा तसेच नुकत्याच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या गुणवंतांचा सत्कार सोहळा दि. २४ एप्रिल रविवार रोजी शहरातील राजीव गांधी टाऊन हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तहसिलदार कैलास चावडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, बिलोली येथील मुख्याधिकारी अमोल चौधरी, प्रतिभा चावडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील, स्वीय्य सहाय्यक राजेंद्र पाटील, डॉ. भरत पाटील, जितेंद्र जैन, शरद पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, मंदा पाटील, प्रवीण ब्राम्हणे, गजु पाटील उपस्थित होते.


Protected Content

Play sound