कामगार कल्याण मंडळातर्फे बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी

पाचोरा, प्रतिनिधी । महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय जळगावच्या वतीने ‘प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत कामगार कल्याण केंद्र, पाचोरा येथे इमारत व बांधकाम कामगार व कुटूंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.

आरोग्य शिबिराच्या या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, अतिथी, भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष पी.जी.पाटील, बांधकाम कामगार तालुकाध्यक्ष प्रविण मिस्तरी, गजानन सुतार, सुनिल सुतार, किशोर वाघ, धनराज सुतार, सतीश लहासे, धुडकू भोई आदींची उपस्थिती होती.
या शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिरात १०० कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. हिंद लॅब, पाचोरा येथील अमित वाणी, शहबाज खान, कुरेशी अशपाक खान यांनी तपासणी केली. याप्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केंद्र संचालक बबन वाघ यांनी केले. आभार शोभा बडगुजर यांनी मानले. यशस्वीतेसाठी किरण पाटील आणि सहकाऱ्यांनी नियोजन केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!