रोटरी क्लब खामगावतर्फे मोफत मोतीबिंदू आणि असंसर्गजन्य रोग तपासणी शिबीराचे आयोजन

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रोटरी क्लब खामगांवद्वारे “नि:शुल्क मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया आणि असंसर्गजन्य रोग तपासणी शिबीर” शुक्रवार दिनांक ३ मे २०२४ रोजी श्री अरजण खिमजी नॅशनल हायस्कुल खामगांव येथे सकाळी १० ते दुपारी १ या दरम्यान आयोजित करण्यात आलेले आहे. दोन्ही तपासण्या या मोफत करण्यात येणार असून पात्र रूग्णांची शस्त्रक्रिया दमाणी नेत्र रुग्णालय अकोला येथे नाममात्र ३०० रुपयांमध्ये होणार आहे.

डोळे आपले बहुमूल्य अवयव आहेत. त्यामुळे त्यांची काळजी घेणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. मोतिबिंदू सामान्यतः उतारवयात होणारी समस्या आहे. जेव्हा डोळ्यातील लेन्सची पारदर्शकता कमी होते तेव्हा दिसणं कमी होत जातं. अशा वेळी मोतिबिंदू झाला असं म्हणता येईल. सामान्यतः मोतिबिंदू होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे वय पण त्याशिवाय मधुमेह, अतिनिल किरणांचा मारा, डोळ्यांना जखम वा अपघात, डोळ्यांमध्ये दीर्घकाळ सूज, अनुवांशिकता ही कारणंदेखील महत्त्वाची ठरतात. मोतीबिंदूची लक्षणे आहेत – अस्पष्ट व निस्तेज दिसणे, एकाच वेळी दोन वस्तू दिसणे, रात आंधळेपणा, चष्म्याचा नंबर पुन्हापुन्हा बदलणे. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेत नैसर्गिक लेन्स बाहेर काढल्यानंतर त्या जागेवर कृत्रिम लेन्स बसवले जातात ज्यामुळे आपली दूर व जवळच्या चष्म्यांपासून सुटका होऊ शकते. पण त्यासाठी तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी होणे आवश्यक आहे.

रोटरी क्लब खामगांवद्वारे “नि:शुल्क मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया आणि असंसर्गजन्य रोग तपासणी शिबीर” शुक्रवार दिनांक ३ मे २०२४ रोजी श्री अरजण खिमजी नॅशनल हायस्कुल खामगांव येथे सकाळी १० ते दुपारी १ या दरम्यान आयोजित करण्यात आलेले आहे. दोन्ही तपासण्या या मोफत करण्यात येणार असून पात्र रूग्णांची शस्त्रक्रिया दमाणी नेत्र रुग्णालय अकोला येथे नाममात्र रुपये ३००/- शुल्क घेऊन करण्यात येईल. अधिक माहितीसाठी रूग्णांनी प्रकल्पप्रमुख देवेश भगत (मो.नं. ७५८८०८००२५), सह-प्रकल्पप्रमुख राजीव शाह (मो.नं. ९४०४८६८६५५) किंवा संकेत धानुका (मो.नं. ९९७०३५१८७७) यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

एकूणच अत्याधुनिक उपचार व शस्त्रक्रियेद्वारे मोतिबिंदू विकारावर मात करून गुणवत्तापूर्ण जीवन जगणे शक्य आहे. तरी शिबिरात नोंदणी करून आपल्या डोळ्यांच्या समस्या सोडवाव्यात असे आवाहन रोटरी क्लब अध्यक्ष सुरेश पारिक, मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया प्रकल्पप्रमुख देवेश भगत, असंसर्गजन्य रोग तपासणी प्रकल्पप्रमुख अतुल अग्रवाल व क्लब सचिव आनंद शर्मा यांनी केलेले आहे.

Protected Content