अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग; तीन जणांवर गुन्हा दाखल

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पिंपळी गावातील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेम करण्यास जबरदस्ती करून तिचा पाठलाग करत विनयभंग केल्याचा खळबळ जनक प्रकार सोमवारी २९ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात मंगळवारी ३० एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजता ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील पिंपळी गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आई-वडील यांच्यासोबत वास्तव्याला आहे. सोमवार २९ एप्रिल रेाजी सायंकाळी ७.३० वाजता पीडित मुलगी ही गावातील मंदिरात जात असताना गावातच राहणारे विधीसंघर्षीत तीन मुलांनी तिचा पाठलाग केला. नंतर तिचा रस्ता अडवत यातील एकाने “मी तुझ्यावर प्रेम करतो] तू माझा प्रपोज ॲक्सेप्ट कर नाहीतर तुझ्या भावाला काहीही करू” अशी धमकी दिली. दरम्यान हा प्रकार पीडित मुलीच्या वडिलांना समजला. त्यावेळी याचा जाब विचारला असता तिघांनी पीडित मुलीच्या वडिलांसोबत वाद घातला. दरम्यान अखेर पीडित मुलीसह तिच्या पालकांनी अमळनेर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार विधीसंघर्षीत तीन अल्पवयीन मुलांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख हे करीत आहे.

Protected Content