रिक्षाचालकाची सव्वा लाखांची फसवणूक; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील शाहू नगरातील रिक्षाचालकाची १ लाख २० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणाांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे..

 

पोलिसात दाखल तक्रारीनुसार असे की, शाहू नगरात काशीनाथ तुकाराम चौधरी वय ६३ हे रिक्षाचालक वास्तव्यास आहेत. त्यांची  बुलढाण जिल्ह्यातील नांदुरा येथील देवकाबाई सचिन इंगळे व पूजा सचिन इंगळे तसेच  जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथील  रेखा पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्याशी ओळखी आहे. या ओळखीचा फायदा घेत चार जणांनी काशीनाथ चौधरी यांचा मुलगा याचा विवाह पूजा इंगळे हिच्यासोबत करवून देण्याचे ठरविले. त्यानंतर देवकाबाई सचिन इंगळे या महिलेने तिच्या घरावरील कर्ज फेडण्याकरीता १ लाख २० हजार रुपये घेतले. यादरम्यानसंबंधितांनी ज्या पूजा हिच्यासोबत काशिनाथ यांच्या मुलाचे लग्न ठरविले होते, त पूजा हिला पक्की विवाह नोंदणीसाठी व नांदण्यासाठी सासरी जळगाव येथे पाठविले नाही, तसेच घेतलेले पैसेही परत केले नाही.  २७ फेब्रुवारी २०२३ च्या दरम्यानच्या काळात हा सर्व प्रकार घडला. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर काशिनाथ चौधरी यांनी शुक्रवार, ११ ऑगस्ट रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन रेखा पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज पाटील दोन्ही रा. कुसूंबा ता. जळगाव, देवकाबाई ऊर्फ कविता बाई सचिन इंगळे व पूजा ऊर्फ पौर्णिमा सचिन इंगळे दोन्ही रा. नांदुरा, ता जळगाव या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक धनराज निकुंभ हे करीत आहेत.

Protected Content