जळगावात पोलिस पत्नीचा जळाल्याने उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील शामराव नगरा शेजारील अशाबाबा नगर येथील रहिवासी पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीने रात्री दिडच्या सुमारास पेटवुन घेतल्याची घटना घडली. ६० टक्के भाजल्याने जळीत गृहीणीला उपचारार्थ डॉ.उल्हास पाटिल वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सरु असतांना तीचा आज सकाळी मृत्यू ओढवला.

सोनाली सोनाली नरेंद्र सोनवणे (वय-२४) असे मयत विवाहीतेचे नाव आहे. पेालिस कर्मचारी नरेंद्र सेानवणे कुटूंबीयांसह अशाबाबा नगर येथे वास्तव्यास आहेत. गुरुवार ९ जुलै रोजी मध्यरात्री सुमारास नरेंद्र यांची पत्नी सेानाली हिने पेटवून घेतल्याची घटना घडली. उपचारार्थ कुटूंबीयांनी त्यांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. जळीत महिलेचे दिर योगेश सेानवणे यांनी घटनेची माहिती रामानंदनगर पेालिसांत कळवल्यानंतर सहाय्यक पेालिस अधीक्षक डॉ.नीलाभ रेाहन, रामानंदनगर पेालिस ठाण्याचे आधीकारी दावाखान्यात पेाचले. कुटूंबीयांशी चर्चा करुन माहिती घेतल्यावर या प्रकरणी अकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली असून. तपासाअंती मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती देतांना सांगीतले.

Protected Content