गांजाचा नशा करणाऱ्या तरूणावर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ख्वॉजामिया दर्गा जवळील मोकळ्या जागेत गांजाचा नशा करणाऱ्या एका तरूणावर जिल्हापेठ पोलीसांनी शनिवारी १२ ऑगस्ट रोजी कारवाई केली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील ख्वॉजामिया दर्गा परिसरात असलेल्या एका भिंतीच्या आडोश्यात रहिम निसार बिस्ती (वय-३७) रा. शाहू नगर, जळगाव हा तरूण अवैधरित्या गांजाचे सेवन करत असतांना शनिवारी १२ ऑगस्ट रोजी रात्री आढळून आला. पोलीसांनी त्यांच्यावर कारवाई करत नशा करणारे साहित्या हस्तगत केले. त्यानंतर पोकॉ कैलास शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रहिम बिस्ती याच्या विरोधात गुंगीकारक औषधीद्रव्य प्रतिबंधात्मक कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मनोज पवार करीत आहे.

Protected Content