बेळगाव (वृत्तसंस्था) गोकाक तालुक्यातील होसुर गावात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ घडली आहे. भिमाप्पा सिद्धप्पा चुनप्पगोळ (३०), मंजुळा चुनप्पगोळ (२५), प्रदीप (८) आणि मोहन (६) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
भिमाप्पा चुनप्पोळ यांनी पहिल्यांदा आपल्या दोन्ही मुलांचा गळफास लावून त्यांचे जीवन संपवले. ते मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर लगेचच भिमाप्पा यांनी आणि त्यांची पत्नी मंजुळा चुनप्पगोळ या दोघांनी फास घेत आपल्या जीवनानाची यात्रा संपवली. चुनप्पगोळ कुटुंबाचे प्रमुख भिमाप्पा यांना नैराश्याने ग्रासले होते. भिमाप्पा हे सिंडिकेट बँकेत गार्ड म्हणून काम करत होते. या आत्महत्येमागे नेमके कारण कोणते याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही.