राज्यातील सर्व बँकेची वेळ होणार निश्चित

Banks ke1D 621x414@LiveMint

 

पुणे प्रतिनिधी । प्रत्येक बँकेच्या शाखांच्या कामकाजाची वेळ वेगवेगळी असल्याने ग्राहकांचा संभ्रम होत असतो. त्यावर इंडियन बँक्स असोसिएशनने नुकताच तोडगा काढला आहे. त्यानुसार आता देशभरातील बँका निर्धारित वेळेत चालणार आहेत. बँक शाखांच्या वर्गवारीनुसार बँकांचे कामकाज तीन वेळात होणार असून हे नवे नियम नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.

या निर्णयानुसार निवासी क्षेत्रातील बँका ९ ते ४ या वेळेत सुरू राहतील आणि त्यापैकी ९ ते ३ या वेळेत ग्राहकांना त्यांचे व्यवहार करता येतील. व्यापारी भागातील शाखा ११ ते ६ या वेळेत सुरू राहतील. या शाखांच्या ग्राहकांना ११ ते ५ या वेळेत आपले व्यवहार करता येतील, तर उर्वरित परिसरातील शाखा १० ते ५ दरम्यान सुरू राहतील व तेथील ग्राहक १० ते ४ या वेळेत व्यवहार करू शकतील. इंडियन बँक्स असोसिएशनच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला होता. त्यात तीन वेळांचे प्रस्ताव देण्यात आले होते. त्यावर राज्य पातळीवरील बँकिंग समितीने (एसएलबीसी) निर्णय घ्यायचा होता. त्यानुसार राज्यातील लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर्सनी आपल्या शाखास्तरीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून, वेळांचे तीन पर्याय निवडले आहेत. महाराष्ट्रासाठी बँक ऑफ महाराष्ट्र ही अग्रणी (लीड) बँक आहे. त्यामुळे ‘एसएलबीसी’चे अध्यक्षपदही बँक ऑफ महाराष्ट्रकडे आहे. त्यामुळे एसएलबीसीने हे वेळापत्रक घोषित केले आहे. हे वेळापत्रक जिल्हा व बँक स्तरावर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

Protected Content