रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील कुसुंबा येथील पाझर तलावा नजिक झालेल्या बकऱ्या चोरीचा शोध पोलीस लावला असून या प्रकरणी कुसुंबा येथील चौघांना अटक करण्यात आली आहे.त्यांच्याकडून सतरा हजार रुपये किमतीच्या बकऱ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. मुंजलवाडी येथील मेंढपाळ गोपाल अर्जुन पिसाळ हे त्यांच्या मालकीच्या बकऱ्या कुसुंबा बु. गावी पाझर तलावाजवळ जंगलात चारत असतांना तीन बकऱ्या कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी गुन्हे शोध पथकाला निर्देश दिले. पोलीस पथक मुंजलवाडी , कुसुंबा, लालमाती रसलपुर ,अभोडा परिसरात पथक अज्ञात आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान गुप्त माहिती मिळाल्याने शोध पथकाने तालुक्यातील कुसुंबा खुर्द येथे धाव घेतली. तनविर रफिक तडवी वय १९ वर्ष, शरीफ जहाबाज तडवी वय २५ वर्ष, कलीम हमीद तडवी वय ३३ वर्ष, अजरुद्दीन महमुद तडवी वय २० वर्ष सर्व रा. कुसुंबा खु. तालुका रावेर यांना ताब्यात घेवुन पथकाने त्यांना रावेर पोलीस स्टेशन येथे आणले.. आरोपीतांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी तीन बकऱ्या चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातुन एकुण १७,०००रुपये किंमतीच्या तिन मुद्दा हस्तगत करण्यात आल्या आहेत
या पथकाने केली कारवाई
सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पो.हे.का.रविंद्र वंजारी, पोका. सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोहेकॉ सिकंदर तडवी हे पुढील तपास करीत आहे.