अगोदर शिवसेना आता राष्ट्रवादी ?

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राणा दांपत्याकडून शनिवारी रामनगर नागपूर येथे हनुमान चालीसा पठण केले जाणार आहे. तर त्याच दिवशी त्याचवेळी राष्ट्रवादीकडून हनुमान चालीसा पठण करण्यात येणार असून परवानगीचा अर्जच सादर झाला आहे.

अमरावतीचे खा. नवनीत राणा आणि आ.रवि राणा हे शनिवारी नागपूर येथे येणार आहेत. त्यांनतर युवा स्वाभिमानी पक्षाची काढण्यात येणाऱ्या सहभागी होणार आहेत. त्यांनतर बाजीप्रभू चौक रामनगर परिसरातील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण नी हनुमान चालीसा पुस्तिकांचे वाटप करण्यात येणार आहे. असे युवा स्वाभिमानी पक्षाचे अमरावती जिल्हाध्यक्ष जितु दुधाने यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

तर दुसरीकडे देशातील अशांततेचे वातावरण दूर व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून हनुमान चालीसा पठण केले जाणार आहे. शनिवारी २८ मे रोजीच बाजीप्रभू चौक रामनगर परिसरातील हनुमान मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसकडूनदेखील हनुमान चालीसा पठण करण्याचे जाहीर नागपूर शहर अध्यक्ष यांनी म्हटले आहे.

शनिवारी हनुमान चालीसा पठण करण्यासाठी नागपूर अंबाझरी पोलीसांकडे परवानगीची मागणी अर्ज सादर करण्यात आला आहे.
एकूणच अमरावतीच्या राणा दाम्पत्याला हनुमान चालीसा पठणावरून यापूर्वी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी पंगा घेतला होता. तर आता राष्ट्रवादीशी सामना करावा लागणार असून शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशीच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Protected Content