काँग्रेसमुक्त भारत’ ही फालतू कल्पना : उद्धव ठाकरे

3Uddhav Thackeray 8

मुंबई (वृत्तसंस्था) ‘मी काँग्रेसमुक्त देश असे बोलतच नाही. मी काँग्रेस नष्ट करा असेही कधी बोलत नाही. कारण विरोधी पक्ष राहिलाच पाहिजे,’ असे सांगतानाच ‘कुणालाही नष्ट करा असे मी कधी म्हणत नाही. नष्ट करा किंवा काँग्रेसमुक्त…हे मुक्त, ते मुक्त या अशा फालतू कल्पना माझ्याकडे नाहीत,’ अशी जोरदार टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच ‘काँग्रेसमुक्त भारत’ संकल्पनेवर टीका केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. देशातील लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतील आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सेना-भाजपा युती, राम मंदिर, शेतकरी आत्महत्येपासून पक्षांतर करणारे उमेदवार अशा अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे.

 

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना, ‘काँग्रेसमुक्त भारत झाल्यास या देशातील सगळे प्रश्न संपतील असे आपल्याला वाटते का?’ असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदींच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ या भूमिकेला आपला विरोध असल्याचे उद्धव यांनी सांगितले. ‘काँग्रेसमुक्त देश किंवा काँग्रेस नष्ट करा असे मी कधीच बोललो नाही. मुळात विरोधी पक्ष असायलाच हवा,’ असे उद्धव यांनी सांगितले. याच संदर्भात बोलताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी विरोधीपक्षाबद्दल दिलेला सल्लाही उद्धव यांनी सांगितला.

 

मुख्यमंत्र्यावर तर जबाबदारी असतेच पण विरोधी पक्षनेत्यावर त्याहून मोठी जबाबदारी असते. मुळात विरोध करणे म्हणजे आकांडतांडव करणे असे नाही. विरोधी पक्षनेत्यासुद्धा जबाबदारी असते. जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका त्याला जास्त पार पाडावी लागते,’ असे एकादा विरोधीपक्षाबद्दल बोलताना शिवसेनाप्रमुखांनी मला सांगितले होते. अशी आठवण उद्धव यांनी या प्रश्नाला उत्तर देताना करुन दिली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना आणि पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे नऊ दिवस उरलेले असतानाच उद्धव ठाकरे यांनी ‘काँग्रेसमुक्त भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेची खिल्ली उडवल्याने युतीतील बेबनाव पुढे आला आहे.

Add Comment

Protected Content