Home राजकीय नथुराम गोडसे आणि मोदींमध्ये फारसा फरक नाही : राहुल गांधी

नथुराम गोडसे आणि मोदींमध्ये फारसा फरक नाही : राहुल गांधी

0
118


rahul and modi
 

तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे यांची विचारसरणी एकसारखीच आहे. त्यांच्यात फारसा फरक नाही, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. ते गुरुवारी केरळ येथील प्रचारसभेत बोलत होते.

 

यावेळी राहुल गांधी म्हटले की, नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींना मारले कारण, त्याचा स्वत:वर विश्वास नव्हता, त्याने कधीच कोणावर प्रेम केले नाही, त्याला कोणाचीही पर्वा नव्हती, त्याचा कोणावरही विश्वास नव्हता. हीच गोष्ट आपल्या पंतप्रधानांना तंतोतंत लागू पडते. त्यांचा विश्वास आणि प्रेम हे केवळ स्वत:पुरतेच मर्यादित आहे. तर नथुराम गोडसे आणि मोदींमध्ये इतकाच फरक आहे की, आपण गोडसे समर्थक आहोत हे सांगण्याची हिंमत नरेंद्र मोदी यांच्याकडे नाही, असेही राहुल यांनी म्हटले.


Protected Content

Play sound