Home क्राईम सिगारेट पिण्यासाठी तरूणाला बेदम मारहाण !

सिगारेट पिण्यासाठी तरूणाला बेदम मारहाण !

0
48


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सिगारेट पिण्याच्या कारणावरून एक तरूणाला तीन जणांना बेदम मारहाण करून दुखापत केली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

चोपडा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पंकज स्टॉपजवळ अमोल माळी याच्या पानटपरीजवळ मनिष संजय पाटील (वय-१८) रा. बोरोले नगर हा उभा होता. त्यावेळी यश सुनिल मकवाना, शुभम महेंद्र पाटील, तानाजी उर्फ गौरव किशोर पाटील सर्व रा. अरिूण नगर चोपडा ता. चोपडा हे तिथे आले. त्यावेळी यश मकवाना याने मनिषला सांगितले की, तु आज मला सिगरेट पाज असे सांगितले. त्यावर मनिषने माझ्याकडे पैसे  नसल्याचे सांगितले. याचा राग आल्याने तिघांनी मनिषला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तर एकान मनिषच्या डोक्यात दगड मारला. जखमीवस्थेत मनिषला तातडीने चोपडा ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस नाईक शेषराव तोरे करीत आहे.


Protected Content

Play sound