यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या रांगेतील अतिदुर्गम भागातील गाव उसमळी तालुका यावल जिल्हा जळगाव येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्देशानुसार जिल्हा स्तरीय कनव्हर्जन्स समिती,जळगाव व सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती उसमळी आयोजित जिल्हा स्तरीय तालुकास्तरीय ग्रामस्तरीय अधिकारी व कर्मचारी यांची सामूहिक वनहक्क व्यवस्थापन संवर्धन आराखडा तयार करणेबाबत नियोजन बैठक घेण्यात आली.

सदर बैठकीत गावातील ग्रामस्थांसोबत गावातील लोकांच्या गरजा, समस्या, अडचणी व मागण्या या सर्व बाबी आराखड्यात नमूद करणे बाबत चर्चा करण्यात आली. तसेच शासनाच्या वतीने सर्व शासकीय विभागाचे जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरिय अधिकारी व कर्मचारी यांनी शासनाच्या कोणकोणत्या योजना सदर आराखड्यात समाविष्ट करता येतील याबाबत गावातील लोकांना सविस्तर माहिती दिली. तसेच सदर बैठकीस अरुण पवार, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,यावल व वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव पाल कैलास सोनवणे, यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास यावल तहसीलचे निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, यावल पंचायत समितीचे गट शिक्षणधिकारी विश्वनाथ धनके यांच्यासह आदी मान्यवर या उपस्थित होते