शारदा विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील साकळी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर. जे. महाजन होते तर व्यासपीठावर पर्यवेक्षक एस.जे पवार, बी इ महाजन, आर सी जगताप,जी एल चौधरी, व्ही बी चौधरी , सदाशिव पी निळे, एम ए महाजन,उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक एस जे पवार यांनी केले. यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी भावनिक मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा सत्कार केला आणि विद्यालयाला व शिक्षकांना भेट स्वरूपात वस्तू दिल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य आर जे महाजन यांनी परीक्षेचे नियोजन,वेळेचे नियोजन,स्पर्धा परीक्षेचे महत्त्व भावी काळातील आवाहने, देशाविषयी तरुणाईची कर्तव्य याविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहितीपर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एम ए महाजन यांनी मानलेत सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महत्वाचे परिश्रम घेतले.

Protected Content