वन खात्याची धडक कारवाई : अवैध डिंकासह मोटारसायकल जप्त

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील बोरखेडा-मारूळ बारी रस्त्यावर वन खात्याच्या पथकाने धडक कारवाई करत अवैध डिंकासह मोटारसायकल जप्त केली आहे.

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या बोरखेडा मारूळ बारी रस्त्यावर पुर्व वन विभागाने सापळा रचुन केलेल्या कार्यवाहीत सुमारे २५ हजार रूपये किमतीचे अवैध मार्गाने बेकायद्याशीर सळई डिंक जप्त केली आहे. वनविभागाच्या या कार्यवाहीच्या धाड सत्रामुळे वृक्षतोड माफीया व डिंकची वाहतुक करणार्‍यांमध्ये चांगली खळबळ उडाली आहे.

या संदर्भात वनविभागाच्या सुत्रांकडुन मिळालेल्या माहिती अनुसार यावल विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख , सहाय्यक वन संरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्व वनक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर, वनरक्षक गोवरधन यांच्या सर्व कर्मचारी पथकाने शासकीय वाहनाने गस्तीवर असतांना गुप्त माहीतीच्या आधारावर सापळा रचुन दिनांक ६ मार्च रोजी रात्री १०, ३० ते ११ वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील बोरखेडा बु॥ शिवारातील तपासणी नाका ते मारुळ बारी या मार्गावरील रस्त्यावर अवैध गौण वनउपज सलई डिंक सुमारे १५ किलो ( किंमत अंदाजे१५५७५ रूपये ) व विना क्रमांकाची मोटरसायकल वरून बेकायदेशीर वाहकतुक करतांना दिसुन आला.

यावेळी वन विभामाच्या गस्ती पथकाने त्याचा पाठलाग केला असता अंधाराचा फायदा घेत अवैद्यरित्या गौण उपजाची वाहतुक करणारा आरोपी मात्र पसार झाला. तर, वन विभागाने मोटरसायकलसह सलई डिंक जप्त करीत त्या अज्ञात गौण वन उपवज चोरटी वाहतुक करणार्‍या आरोपी विरुद्ध भारतीय वन अधिनियम१९२७चे कलम ४१ ( २ ) ब , ४२ , ४३ अन्वये वन गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशाने पुर्व वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे कर्मचारी करीत आहे. मागील काही दिवसापासुन वन विभागाने चालविलेल्या कार्यवाहीच्या धडक मोहीम मुळे सातपुडा पर्वतातील वनसंपत्तीचा नाश करणार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

Protected Content