वादळी वार्‍याने धरणगाव तालुक्यातील पिके जमीनदोस्त

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यात साल सायंकाळी आलेल्या वादळी वार्‍यासह पावसाने अनेक गावांमधील शिवारातील पिके जमीनदोस्त झाली असून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यात काल (दिनाक ६) रोजी संध्याकाळी तुरळक पावसाच्या सरी पडल्या. मात्र प्रचंड वादळ वार्‍याने परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे धरणगाव शिवारात एका शेतात नारळाच्या झाडावर वीज पडून झाड जळाले मात्र जवळ पास कुणी नसल्याने कोणतीही हानी झाली नाही. बाभळे, गारखेडा, आनोरा, धानोरा, धरणगाव, शिवार, गंगापुरी, पष्टाने, वंजारी, खपाट, पथराड, बोरखेडा, विवरे, भवरखेडे, अंजनी परिसरातील हिंगोणे,पिंप्री कल्याने खुर्द ,कल्याणे होळ , भोद परिसरात मका ,गहू पिके वादळ वार्‍यामुळे जमीन दोस्त झालेली आहेत.

यात कल्याण खुर्द येथील पंढरीनाथ बोरसे यांच्या दोन एकर शेतातील मका जमीन दोस्त झाला असून शेतकर्‍यांचे मोठेआर्थिक नुकसान झाले आहे. या शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत व तातडीने आर्थिक साह्य करावे अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकरी करीत आहेत.याबाबत शेतकर्‍यांनी कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता उद्या दिनाक ८ रोजी शेतात पीक पाहणी व पंचनामे करण्यासाठी येणार असल्याचे समजते.
अवकाळी पाऊस ,वादळ वार्‍यामुळे शेतकरी हैराण झालेले आहेत आधीच शेत मालाला भाव नाही,कांद्याचे वांधे होत आहेत ,योग्य भाव नसल्याने कापूस घरात पडून आहे ,आता मका, गहू,हरबरा पिकाचे नुकसान झाले आहे अशा परिस्थितख कसे जीवन जगावे असा प्रश्न शेतकर्‍यांना पडलेला आहे.

आस्मानी आणि सुलतानी आपत्तीने ग्रासले गेल्याचा भावना शेतकरी व्यक्त करतात मार्च महिन्यात शेती साठी घेतलेले विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे कर्ज भरावे लागते अशा परिस्थिती कर्ज कसे भरणार, या कर्जाला देखील मुदतवाढ मिळावी अशी चर्चा शेतकरी वर्गात आहे. शेतकर्‍याच्या तोंडाशी आलेला घास हिरावून नेलेला आहे यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लक्ष घालून तातडीने तहसिलदार व संबंधित अधिकार्‍यांना पंचाणाम्याचे आदेश देवून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी देखील राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख यांनी केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content