मोबाईल टॉवरमधून बॅटरी व डिझेल चोरीचा डाव उधळला

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मोबाईल टॉवरमधून बॅटरी आणि डिझेलची चोरी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, भडगांव ते चाळीसगांव रोडवरिल निंभोरा ता. भडगांव शिवारातील शेतगट नं. २१९/२/५ मध्ये असलेले जिओ कंपनीचे टॉवर आहे. या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी वस्तुंना हात लावण्याचा अलार्म कंपनीला कळाला. त्यावरुन पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांचे आदेशावरुन रात्रगस्त करित असलेले पोकॉ/१९५३ प्रकाश गवळी व पोलीस स्टेशनच्या शासकिय वाहनावरिल वाहन चालक पोकॉ/३७१ संभाजी पाटील अशांसह पोलीस स्टेशनच्या शासकिय वाहनाने तिकडे रवाना झाला.

या ठिकाणी पोलीसांना हिरवट मेहंदी रंगाची स्कार्पियो गाडी क्र.॥ ०-२५६८
की रोडवर दुरुन उभी असलेली दिसली. सदर वेळी स्कार्पियो गाडीतील संशयित आरोपींना पोलीस आल्याची चाहुल लागल्यामुळे ते सदर ठिकाणी त्यांचे ताब्यातील नमुद स्कार्पियो गाडीने तेथुन पळुन जाऊ लागले. पोलीस पथकाने या गाडीचा पाठलाग केला. दरम्यान, मळगांब गावाजबळ यातील चोरट्यांनी पळ काढत वाहन तेथेच टाकून दिल्याचे दिसून आले.

पोलीस पथकाने तपास केला असता, गाडीत एक्साईड एक्सप्रेस कंपनीच्या ४ बँटर्‍या, प्रो ऑन कंपनीची लाल रंगाची बँटरी, डिझेल ओढण्यासाठी बँटरीवर चालणारे मशिन नळीसह, एक सेल बँटरी, ९ मोठ्या प्लॅस्टिक कँन पैकी एक डिझेल ने भरलेली, दोन काळ्या रंगाच्या सँक; एक लोखंडी टामी, एक स्क्रु ड्रायव्हर, करवत पान (मोठे), करवत पान (लहान), पकड, वायर कटर आदी साहित्य आढळून आले.

या संदर्भात सतीश दगा पवार, वय-२८ वर्षे, धंदा जिओ टेक्निशियन, रा. स्वामी
समर्थ मंदिरासमोर, बाळद रोड, भडगांव यांनी नमुद प्रकरणी यातील अनोळखी आरोपीतांविरुद्द फिर्याद दिल्याने भडगांव पोलीस स्टेशनला गुरन ६३/२०२३ भादवि कलम ३७९,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक सो| चाळीसगांव परिमंडळ, चाळीसगांव रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख, पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सफौ/९७७ कैलास फकिरा गिते, नेम. भडगांव पोलीस स्टेशन हे करित आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content