किराणा व्यापाऱ्यास लुटणाऱ्या टोळीतील एकाला अटक

bhusawal news 5

भुसावळ प्रतिनिधी । किरणा मालाची विक्री करून जमवलेले साडेचार लाख रूपये घेवून घरी जाणाऱ्या व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चोरट्यांपैकी एकाला भूसावळातून अटक करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की, विनीश कुमार मदनलाल जेन वय 42 रा.सनावद जि.खरगोन हे किराणा सामान विकण्याचे मोठे व्यापारी व त्यांचे
किराणा सामान विकण्याचे होलसेल दुकान आहे. 15 जून 2019 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास किराणा दुकानाचे सामान विकून 4 लाख 50 हजार रूपये रोख रक्कम घेवून जात असतांना मोहना गावावरून सनावदला जात असतांना बखरगाव, हवशपुरा यांच्यामध्ये असलेल्या विटांच्या भट्या जवळ अज्ञात तीन भामट्याने जबरदस्तीने हातातील पैशांची पिशवी हिसकावून पसार झाले होते. याप्रकरणी धनगाव पो.स्टे जि.खंडवा पोलीसात अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाला तेव्हापासुन त्यातील आरोपी हा 3 महिन्यांपासून फरार होता त्यातील संशयित आरोपी शिव संताराम नायक वय- 27 रा. भगवान पुरा खंडवा याला रविवार 29 सप्टेंबर 2019 रोजी रात्री 9.30 वाजता भुसावळ रेल्वे स्टेशन परीसरात आला असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने त्याला अटक केली.

Protected Content