जी. एम. कोविड केअर सेंटरमध्ये पहिल्या कोरोनामुक्त रूग्णाच्या हस्ते ध्वजारोहण

जळगाव प्रतिनिधी । रायसोनी इन्स्टीट्युटच्या वसतीगृहातील जी.एम. फाऊंडेशनच्या कोविड केअर युनिटमध्ये जिल्ह्यातील पहिल्या कोरोनामुक्त रूग्णाच्या हस्ते ध्वजारोहण करून एक सकारात्मक संदेश देण्यात आला.

माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या जी.एम. फाऊंडेशनतर्फे शिरसोली रस्त्यावर असणार्‍या रायसोनी इन्स्टीट्युटच्या वसतीगृहात कोविड-१९ केअर युनिट कार्यरत करण्यात आले आहे. त्यांचे सहकारी आरोग्यदूत अरविंद देशमुख हे स्वत: या केअर सेंटरचे नियंत्रण करत असून येथे अतिशय दर्जेदार अशा सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, आज या कोविड केअर सेंटरमध्ये स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साह व चैतन्यदायी वातावरणात साजरा करण्यात आला. याचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील प्रथम कोविड रुग्ण मौलना फिरोज शेख यांच्या हस्ते करण्यात आला. ते कोविड-१९ विषाणूचा संसर्ग असणारे जिल्ह्यातील पहिले रूग्ण होते. तसेच ते कोरोनामुक्त झालेले पहिले रूग्ण होते. हे विशेष. आज जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचा वेग वाढला असून त्यांना ध्वजारोहणाचा सन्मान देऊन जी.एम. फाऊंडेशनने एक सकारात्मक संदेश दिला आहे.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जात पडताळणी समितीचे सचिव अप्पर जिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर होते. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते गनी मेमन, आरोग्यदूत अरविंद देशमुख, अ‍ॅड. कुणाल पवार उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सावंत, डॉ. मोनिसा शेख, पुनम सपकाळे, शिवाजी पाटील, मनोज जंजाळ व अक्षय जाधव यांनी परिश्रम घेतले.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content