कलेच्या दृष्टीने पिसुर्वो यांची मॉर्डन आर्ट वेगळेपण सिध्द करणारं – उद्योजक अशोक जैन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जगभरातील १६ देशात ज्यांच्या चित्रकलेला मानाचे स्थान त्यांनी श्रध्दापूर्वक मोठेभाऊ तथा भवरलालजी जैन यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रांचा आविष्कार केला. कलावंत ज्यावेळी सभोवतालची सृष्टी जेव्हा आपल्या आतल्या डोळ्यांनी पाहतो तेव्हा तो कुंचल्यातून सजीव करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रतिभावंतावर जीवनमूल्यांची सखोल जाण असली तर त्या कलाकृती निश्चितच व्यापक भावार्थ घेऊन साकार होतात. भवरलालजी जैन यांच्या ८५ चित्रांकृती मनाला आनंद देणाऱ्या, चांगल्या कृतीचा जागर करणाऱ्या सुंदर मनाचं प्रतीक आहे असे मनोगत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केले.

जामनेर येथील जगविख्यात चित्रकार जितेंद्र सुरळकर (पिसुर्वो) यांनी भवरलालजी जैन यांच्या ८५ व्या जन्मदिनानिमित्त मोठेभाऊंच्या जीवनावर आधारित ८५ चित्र चितारलेली आहेत. त्या ‘A tribute to बडे भाऊ’ चित्रप्रदर्शन भाऊंच्या उद्यानातील वसंत वानखेडे आर्ट गॅलरी येथे दि.३० डिसेंबर ते ३ जानेवारी २०२३ पर्यंत सर्वांना उद्यानाच्या वेळेत पाहता येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटनाप्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी जगविख्यात चित्रकार जितेंद्र सुरळकर (पिसुर्वो), चोपडा ललित कला विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र महाजन, तरूण भाटे, विकास मल्हारा, विजय जैन, सचिन मुसळे, सुशील चौधरी, सचिन मुसळे, चेतन पाटील, योगेश सुतार, मनोज जंजाळकर, जितेंद्र चौधरी, रूपाली पाटील यांच्यासह कलाप्रेमी उपस्थित होते. सुत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले.

कान्हदेशातील मातीत वाढून जगाला वेगळी ओळख निर्माण करणारे भवरलालजी जैन हे जामनेर तालुक्यातील वाकोद येथील आणि चित्रकार पिसुर्वो ही जामनेर तालुक्यातीलच. पिसुर्वो यांनी कान्हदेशातील रंग, माती, संस्कृती आणि निसर्गाला आपल्या विशिष्ट चित्रशैलीत जगासमोर आणले. यातून त्यांची जवळपास १६ देशांमध्ये प्रदर्शनी कलाप्रेमींना भुरळ करून गेली. याच भूमिपुत्राने आपल्याच तालुक्यातील ज्येष्ठ विचारवंत तथा उद्योजकाच्या उद्देशून ‘माणूस कितीही व्यस्त किंवा मोठा असला तरी समाजासमोर तो अनेकांतील एक असतो’ तसे पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन. यांच्या जीवनावरती ८५ चित्रे चितारलेली आहेत. कलाप्रेमींसाठी सतत प्रोत्साहन देणाऱ्या भवरलालजी जैन यांच्या चित्रांतून त्यांचे व्यक्तिमत्त्व कलाप्रेमींसह रसिकांना प्रदर्शनामध्ये अनुभवता येईल.

पिसुर्वो यांनी जीवनातील सात या आकडाचे गणित उलगडे आणी सात पासून सुरू झालेला चित्रप्रवास सांगताना मोठ्याभाऊंची पहिल्या भेटीचा प्रसंग सांगितला. सातपुड्याचा सात रांगा, अंबाई, निंबाई, उमाई, गौराई, मुक्ताई, पावराय, भिवराई या सात बहिणींचे प्रतिकात्मक इन्स्टाॕलेशन मांडले आहे. कान्हदेशाची संस्कृती, निसर्ग येथील मातीतील रंग, सुगंध यातुन एखादी व्यक्ती आपल्या भूमितील कलावंताला प्रोत्साहन देण्यासाठी जी साथ देतो ते अधोरिखेत करणारी कृतज्ञतेचे प्रतिकात्मक दर्शन पिसुर्वो यांच्या प्रदर्शनात दिसते. भवरलालजी जैन यांच्या आदर्श असलेले महात्मा गांधी यांच्यापासून समाजाकडे विश्वस्त या भावनेने पाहण्याची ऊर्जा, केळी,आंबा लागवड यासह तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांच्या जीवनमात घडविलेला बदल, यातुन ग्रामीण भागात निर्माण झालेले रोजगाराचे जाळे यासह पिसुर्वा यांच्या २००६ ते २०२२ पर्यंत चा चित्रप्रवास या प्रदर्शनात पाहता येईल. यासाठी वसंत वानखेडे कलादानास जळगावकरांनी भेट द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content