धरणगाव उपनगराध्यांच्या हस्ते महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण

99ba2020 626d 41dc 89f5 b2b80c385973

धरणगाव (वृत्तसंस्था) येथील नगरपालिकेच्या आवारात आज महाराष्ट्र दिन व कामगार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष अंजली विसावे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 

यावेळी उपस्थित न.पा. मुख्यधिकारी सपना वसावा, नगरसेवक सुरेश महाजन, भागवत चौधरी, भाजपा गटनेते कैलास माळी, मा. उपनगराध्यक्ष देविदास महाजन, चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, नगरसेविका मंदा धनगर, शोभा राजपूत, शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री, सुनील जावरे, कडू बयस, तौसीफ पटेल, भीमराव धनगर, योगराज खलाने हे उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत नगरपालिकेचा सर्व कामगाराना दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सर्व कर्मचारी वर्ग व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन पालिका कर्मचारी इनायक अली यांनी केले.

Add Comment

Protected Content