बिनधास्त फोडा फटाके : अखेर बंदीचा निर्णय मागे !

जळगाव प्रतिनिधी | यंदाच्या दिवाळीत फटाके विक्रीवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय अखेर मागे घेण्यात आल्यामुळे या वर्षाच्या दिवाळीत फटाके फोडता येणार आहेत.

याबाबत वृत् असे की,  ऐन दिवाळीच्या तोंडावर जळगावसह उत्तर महाराष्ट्रात फटाके विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांना तसे निर्देशही दिले होते. विशेष सभा घेऊन फटाके बंदीबाबत आपआपल्या विभागांना तात्काळ निर्णय घेण्याचे आदेशही गमे यांनी दिले होते. राज्य शासनाच्या माझी वसुंधरा योजने अंतर्गत वायू प्रदूषण रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांनी पुढाकार घेऊन फटाके विक्रीवर बंदी घातली होती.

मात्र विभागीय आयुक्तांच्या या निर्देशावर अनेकांनी नाराजीचा सूर लावला होता. फटाके व्यावसायिकांसह हिंदुत्ववादी संघटनांनी याला विरोध केला होता. या पार्श्‍वभूमिवर, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे फटाके विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Protected Content