ब्रेकींग : जिल्ह्यातील रात्रीची संचारबंदी १५ मार्चपर्यंत वाढविली

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रात्रीच्या संचारबंदीमध्ये वाढ करत याची मुदत आता १५ मार्चपर्यंत वाढविली आहे. यासोबत अन्य नियमदेखील १५ मार्चपर्यंत लागू राहणार आहेत.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आजपासून रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत अशी संचारबंदी जाहीर केली होती. ही संचारबंदी २२ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली होती. यात शाळा, कॉलेज व क्लासेससह सार्वजनीक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली होती.

जळगाव जिल्ह्यात मध्यंतरी कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आली होती. मात्र अलीकडच्या काही दिवसांमध्ये रूग्णांची संख्या वाढीस लागली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तर कोरोना रूग्णांचा स्फोट झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्याचे संकेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले होते. यानंतर जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्ह्यात रात्री दहा ते पहाटे पाच या वेळेत संचारबंदीचे आदेश जारी केले होते. या सात तासांमध्ये कुणीही रस्त्यावर फिरतांना आढळून आल्यास त्याच्यावर नियमानुसार कारवाई होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच ६ मार्चपर्यंत सार्वजनीक कार्यक्रमांवर देखील बंदी घालण्यात आली होती.

दरम्यान, अद्यापही कोरोनाचे रूग्ण वाढतच असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रात्रीची संचारबंदी १५ मार्चपर्यंत वाढविले असून याबाबतचे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत.

Protected Content