आमदार जितेंद्र आव्हाड यांना जामीन

 

ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हर हर महादेव चित्रपटाच्या वादातून मारहाण केल्याच्या प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड यांना आज कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विवियाना मॉलमधील ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. याप्रकरणी अटक झाल्यावर कोर्टाने आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने आव्हाडांना जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, आज दिवसभरात या प्रकरणी खूप घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आव्हाड यांची पाठराखण करत हर हर महादेव चित्रपटाचा निषेध केला. तसेच त्यांच्या समर्थकांनी आज देखील आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले.

Protected Content