ज्वारीची कणसे कापून नेली : सहा जणांविरूध्द गुन्हा

यावल प्रतिनिधी । चोपडा रोडवरील महाजन पेट्रोल पंपाजवळील शेतातून एका शेतकऱ्याच्या मालकीचे ज्वारीची कणसे चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शेख गुलाम रसूल अब्दुल नबी वय 70 रा.बाबूजी पुरा यावल यांचे चोपडा रोड वरील महाजन पेट्रोल पंपाजवळ शेत आहे. त्यांनी शेतात ज्वारीचे पीक पेरले आहे. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गावातील राजीव वामन कोलते, सुनिल वामन कोलते, गणेश राजू कोलते, बापू वामन कोलते, अरुण राजू कोलते आणि संगीता सुनील कोलते (सर्व राहणार यावल) यांनी शेतातील ज्वारीची कणसे कापून चोरून नेले व जास्त बोलू नका तुम्हाला पण कापून टाकेल अशी धमकी दिली. याप्रकरणी शेख गुलाम रसूल अब्दुल नबी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास सहायक फौजदार नेताजी वंजारे करीत आहे.

Protected Content