अयोध्यानगरातील खुल्या भूखंडाला आग; अग्निशमन बंबाने विझविली आग (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । येथील आयोध्या नगरातील सद्गुरू नगर येथील देशमुख डेअरी मागील खुल्या भूखंडावरील गवताने अचानक पेट घेतला. यावेळी येथील नगरसेवक मीनाताई सपकाळे यांचे पती धुडकू सपकाळे यांनी अग्निशमन दलास याबाबत भ्रमणध्वनीद्वारे कळविले असता अग्निशमन दलाचा बंब तात्काळ हजर झाला. 

सद्गुरू नगरातील खुल्या भूखंडावर दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास आग लागली होती. या खुल्या भूखंडाजवळ तीन ते चार वाहने उभी होती. नागरिकांनी सतर्कता दाखवून ती लागलीच काढल्याने पुढील अनर्थ टळला. तर अज्ञाताने कचरा पेटविला असता आग लागल्याचे स्थानिक रहिवाश्यांनी सांगितले. धुडकू सपकाळे यांनी अग्निशमन विभागात फोन केला असता ५ मिनिटात तेथे अग्निशमन दलाचे बंब व जवान दाखल झालेत. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. अग्निशमन दलाच्या पथकात वाहनचालक देविदास सुरवाडे, रोहिदास चौधरी,  भगवान पाटील,वसंत कोळी, नितीन बारी यांचा समावेश होता. दरम्यान धुडकू सपकाळे व येथील रहिवाश्यांनी अग्निशमन दलाने दाखविलेल्या तत्परतेचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.

https://www.facebook.com/508992935887325/videos/273362164341655

 

Protected Content