यादव बंधूंवर गुन्हा; नेत्याच्या हत्येचा आरोप

पाटणा वृत्तसंस्था । राजदचे माजी नेते शक्ती मलीक यांच्या हत्ये प्रकरणी लालूप्रसाद यांचे पुत्र तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीच झालेल्या या घटनेने राजदला धक्का बसल्याचे दिसून येत आहे.

राजदचे माजी नेते शक्ती मलिक यांच्या हत्ये प्रकरणी बिहार पोलिसांनी रविवारी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, त्यांचे बंधू तेजप्रताप यादव आणि अनिल कुमार साधू यांच्यासह सहा जणांविरोधात एफआयआरची नोंद केली आहे. राजदचे माजी नेते शक्ती मलिक यांची रविवारी सकाळी हल्लेखोरांनी घरात घुसून गोळ्या घालून हत्या केली. यानंतर मलिक यांच्या पत्नीने या प्रकरणी सायंकाळी तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव आणि अनिल कुमार साधु यांच्यासह सहा जणांविरोधात तक्रार नोंदवली. मलिक यांच्या कुटुंबीयाचा आरोप आहे की ही लोकं मलिक शक्ती मलिक यांना जीवे मारण्याची सातत्याने धमकी देत होते.

दरम्यान, मलिक यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारावरून तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव, अनिल कुमार साधु यांच्यासह सहा जणांविरोधात षडयंत्र रचून हत्या केल्याचा आरोप करून, एफआयआर नोंदवण्यात आला आहे. बिहारमधील निवडणूक तोंडावर असतांना खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आल्याने राजदला धक्का बसल्याचे दिसून येत आहे.

Protected Content