हिंगोणा उपसरपंचपदी महेश राणे यांची बिनविरोध निवड

upsarpachpadi nivad

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेश राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

हिंगोणा तालुका यावल या ग्रामपंचायतच्या सरपंच सत्यभामा भालेराव हे मागील दोन महीन्यांपासुन काही कारणामुळे सुट्टीवर गेले असतांना उपसरपंच वैशाली भोळे या ग्रामपंचायती प्रभारी सरपंच म्हणुन पदभार सांभाळून होत्या. मात्र वैशाली भोळे यांनी देखील आपल्या प्रभारी सरपंच आणी उपसरपंच या दोघ पदाचा राजीनामा दिला. ग्रामपंचायतच्या सभागृहात सरपंच सत्यभामा भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत ग्रामपंचायत सदस्य महेश राणे यांची उपसरपंचपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

या सभेस ग्रामपंचायत सदस्य शेख भिकारी, शेख ईस्माइल मनियार, भरत पाटील, छब्बु महेताब तडवी, छब्बु खुदाबक्ष तडवी उपस्थित होते. उपस्थितांनी महेश राणे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचा सत्कार केला.

Protected Content