भुसावळ प्रतिनिधी । जमावबंदीचे उल्लंघन करून आंदोलन केल्याबद्दल आमदार संजय सावकारे यांच्यासह भाजप पदाधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील नाहाटा चौफुलीवर १ ऑगस्टला भाजपने रास्तारोको आंदोलन केले होते. जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू असताना फिजिकल डिस्टंसिंग न पाळता आंदोलन केल्यामुळे बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनीय विभागाचे पोलिस कर्मचारी सचिन पोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आमदार संजय सावकारे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा. डॉ. सुनील नेवे, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, पवन बुंदेले, अमोल महाजन, किशोर पाटील, पुरुषोत्तम नारखेडे, गिरीश महाजन, अर्जुन खरारे यांच्यासह १० ते १२ पदाधिकार्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत बाजारपेठ पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जयराम खोडपे पुढील तपास करत आहेत.