डॉक्टर, परिचारिका किंवा कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यास पाच वर्षांपर्यंत शिक्षा

Attack 20on 20Doctors

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांना पायबंद घालण्यासाठी कठोर कायदा आणण्याची प्रक्रिया केंद्रीय आरोग्य विभागाने सुरू केली असून यासाठीचा मसुदा जाहीर केला आहे. त्यानुसार आता आरोग्य क्षेत्रामध्ये सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांना मारहाण किंवा हिंसाचार केल्यास आता सहा महिने ते पाच वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि ५० हजारापासून पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.

 

या कायद्याअंतर्गत वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, निम्न वैद्यकीय कर्मचारी, प्रयोगशाळांमधील कर्मचारी, रुग्णवाहिकेचा चालक आणि मदतनीस यांना मारहाण किंवा हिंसाचार करणे आता दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा असेल. यामध्ये दोषी आढळलेल्यांना सहा महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली जाईल. तसेच ५० हजारांपासून पाच लाखांपर्यंतचा दंडही ठोठावला जाईल. आरोग्य सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय आस्थापना (हिंसाचार आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध) विधेयक २०१९ चा मसुदा आरोग्य विभागाने सूचना आणि हरकतींसाठी खुला केला आहे.

Protected Content