गेंदालाल मिल परिसरात एकाच्या डोक्यात दारूची बाटली फोडली

जळगाव प्रतिनिधी । गेंदालाल मिल परिसरात काहीही एक कारण नसतांना तरूणाला शिवीगाळ करून दारूची बाटली डोक्यात टाकल्याने गंभीर जखमी केल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अधिक माहिती अशी की, सागर पंडीत शिंदे (वय-२८) रा. गेंदालाल मिल जळगाव हा तरूण आपल्या आई, पत्नी व मुलगी सह वास्तव्याला आहे. घरात किरकोळ वाद असल्यामुळे सागर शिंदे हा त्याच्या घरात बडबड करत होता. २६ मे रोजी दुपारी १ वाजता अशीच एक बडबड करत असतांना त्याच्या घरासमोर राहणार शेरू (पुर्ण नाव माहित नाही) हा त्याच्या घरी येवून लाथ मारून बंद दरवाजा तोडला. घरात अनधिकृपणे प्रवेश करून गल्लीत शिवीगाळ का करतो असे बोलून सागर शिंदेला शिविगाळ केली. हातातील दारूची बाटली सागरच्या डोक्यात हाणली. यात सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमीवस्थेत सागर शिंदे थेट शहर पोलीस ठाण्यात येवून शेरूविरूध्द तक्रार दिली. प्राथमिक उपाचा घेवून सागर शिंदे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. 

Protected Content