नाना पटोलेंच्या आप्तांवर गुन्हा दाखल

पिंपरी – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बनावट सही व कंपनीचा बनावट शिक्का वापरून खोटा दस्त बनवून फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे व्याही व जावयाच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पवन मनोहरलाल लोढा (वय २४, रा. नीतेश कुंज, सेक्टर २४, निगडी प्राधिकरण) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पटोले यांचे व्याही शंकर नामदेव काळभोर (वय ५८), जावयाचे भाऊ रोहित शंकर काळभोर (वय ३५, दोघेही रा. जैन मंदिर रोड, मदनलाल धिंग्रा मैदानाजवळ प्राधिकरण) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मे. कोहिनूर ट्रेड होम या कंपनीचा संचालक रोहित व व्यवस्थापक शंकर यांनी फिर्यादी यांच्या एक्साया अलाईज या कंपनीने दिलेल्या धनादेशाचा गैरवापर केला.

हे धनादेश वटविण्याकरिता बँकेत भरून फिर्यादीचा विश्वासघात करून फिर्यादी व त्यांच्या कंपनीची फसवणूक केली. तसेच कंपनीचा जो खाते उतारा न्यायालयात दाखल केला आहे त्यावर फिर्यादीची बनावट सही करून त्यांच्या कंपनीचा बनावट शिक्का बनवून खोटा दस्त तयार केला. उतार्‍यावरील सही व फिर्यादीच्या सहित बरीच तफावत असल्याने आरोपींनी न्यायालयाची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Protected Content