कॉपीबहाद्दरांवर आता थेट दाखल होणार गुन्हा !

पुणे- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कॉपी ही शिक्षण क्षेत्राला लागलेली कीड असून यावर उपाय म्हणून आता कॉपी बहाद्दरांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

पुणे विद्यापीठाने कॉपी बहाद्दरांवर आता नवीन कठोर उपाय अंमलात आणण्याची घोषणा केली आहे. आता यापुढे कोणी परीक्षेत कॉपी करताना आढळला तर त्याला थेट जेलची हवा खावी लागणार आहे. ऑनलाईन सत्र परीक्षेत कॉपी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कॉपी बहाद्दरांना हा इशारा दिला आहे. कॉपी केल्यास आयटी ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल होणार आहे.

ऑनलाईन परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा वापर करू नका, असे आवाहन पुणे विद्यापीठाने केले आहे. गेल्या दोन वर्षात ऑनलाईन परीक्षा देताना अनेक विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळले. यावर्षी विद्यापीठाने कठोर नियम तयार केले आहे.

आयटी कायदा २०१६ मधील काही कलम ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकारांना तंतोतंत लागू होतात. यात दोषी सापडणार्‍यांवर दखलपात्र गुन्हा दाखल होईल. त्यानंतर दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करून प्रामाणिकपणे पेपर सोडवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content