कंजरवाड्यातील कारवाईत ११ जुगारी ताब्यात

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कंजरवाडा भागात असणार्‍या जुगार अड्डयावर एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकून ११ जुगारींना ताब्यात घेतले आहे.

कंजरवाड्यातील मोकळ्या जागेत काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रामकृष्ण पाटील, आनंदसिंग पाटील, अशोक सनकत, नितीन पाटील, सतीश गर्जे, मुदस्सर काझी, सचिन चौधरी, गोविंदा पाटील यांच्या पथकाने छापा मारला. या वेळी तेथे अविनाश मगन नेतलेकर (वय २८), सचिन अरुण गारुंगे (वय २६), प्रदीप जनार्दन नेतलेकर (वय ३९), मयूर जमनादास बागडे (वय २४), भूषण समाधान बाविस्कर (वय १८), शुभम सुनील तायडे (वय २०), सुरेश उदेसिंग गुमाने (वय ४९), शक्ती राजू बागडे (वय ३०), आशिष नरेश भाट (वय २१), अविनाश किशोर जोशी (वय २१) व आकाश अरुण दहियेकर (वय ३४) हे जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

Protected Content