धरणगाव प्रतिनिधी । खा. उन्मेश पाटील यांच्याबद्दल आमदार राजूमामा भोळे यांच्या घराबाहेर व संपर्क कार्यालयाबाहेर मध्यरात्री बदनामीकारक मजकूर लिहिण्यात आला.यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन धरणगाव भाजपाच्या वतीने देण्यात आला.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खा.उन्मेषदादा पाटील यांच्याविषयी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे यांच्या घराबाहेर व संपर्क कार्यालयाबाहेर मध्यरात्री बदनामीकारक मजकूर लिहिण्यात आला. त्यावेळेस राजुमामा स्वतः घराबाहेर आले असता त्यांना (एमएच १९ ४१४१) या गाडीत ४-५ जण पळ काढतांना दिसले. सदर लिखाणातून खा. उन्मेष पाटील व आमदार राजूमामा भोळे यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर लिहिला. अश्या लोकांपासून दोन्ही नेत्यांच्या जीवितास धोका आहे. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितावर कडक कारवाई करावी अन्यथा कार्यकर्त्यांचा भावनेचा उद्रेक झाल्यास प्रशासन जवाबदार राहील. असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
त्याचप्रमाणे १८ जानेवारी रोजी पाळधी पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस उपनिरीक्षक साहेबांसमोर पं.स.माजी सभापती मुकुंद न्ननवरे, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, संजय लोटन पाटील, विक्रम पाटील आदींनी खा. उन्मेष पाटील यांच्याबाबत अर्वाच्य भाषा वापरली आहे .त्याआशयाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रसारित केलेला आहे. वरील दोन्ही घटना लक्षात घेता संबंधितावर लवकरात लवकर गुन्हे दाखल करण्यात यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
याप्रसंगी भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन, अँड.वसंतराव भोलाने, पुनीलाल महाजन, शेखर पाटील, तालुका सरचिटणीस सुनिल पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, नगरसेवक ललित येवले, भालचंद्र माळी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष निर्दोष पाटील, कन्हैया रायपूरकर, शरद भोई, मधुकर पाटील, विशाल पाटील, सचिन पाटील, निलेश महाजन आदी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.