पाळधी गावांसह परिसरातील शाळा सुरू करण्याबाबत ग्रामस्थांची मागणी

जामनेर, प्रतिनिधी | कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर तालुक्यातील पाळधी गावांसह परिसरातील शाळा ह्या बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे तात्काळ शाळा सुरू करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोनाचे कारण पुढे करत राज्य सरकारने १० जानेवारीपासून सर्व शाळा बंद केल्या आहेत. यामुळे पाळधी गावासह परिसरातील शाळा बंद असल्या कारणामुळे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे तातडीने शाळा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदार अरुण शेवाळे व गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे यांच्याकडे केली आहे. यावेळी ईश्वर चोरडिया, संजय शेळके, दीपक माळी, विनोद कोळी, मुरलीधर सुरवाडे, राजू पाटील, समाधान शेळके, अशोक पाटील यांच्यासह पाळधी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदनात गावासह परिसरात एकही कोरना रुग्ण नसल्यामुळे पाळधी गावाच्या परिसरातील शाळा सुरू करण्यात यावी याबाबतचे नियोजन शाळा व्यवस्थापन समितीतर्फे करण्यात आले आहे. शाळा सुरू झाल्यानंतर सर्व ग्रामस्थ हे कोरोना नियमाचे पालन करू असे आश्वासन दिले आहेत. त्यामुळे गावातील शाळा सुरू करण्यास आम्हाला परवानगी देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ तर्फे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Protected Content