शिवसेनेत या अन् विधानसभा लढवा : श्रीराम पाटलांना खुली ऑफर !

रावेर प्रतिनिधी । येणाऱ्‍या २०२४ ची विधानसभा उद्योजक श्रीराम पाटील यांनी शिवसेनेच्या तिकीटावर लढवावी, सर्वांगीण विकास तसेच युवकांना रोजगार देण्याचे स्वप्न निवडणून येऊन पूर्ण करावे, आम्ही आपल्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन आमदार चंद्रकांत पाटील वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश देतांना व्यक्त करत रावेर विधानसभेतुन लढवण्याचे सूचक इशारा दिला आहे.

उद्योजक श्रीराम पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त मॅक्रोव्हीजन स्कूल आवारात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शुभेच्छा संदेश देतांना आमदार पाटील यांनी उद्योजक श्रीराम पाटील यांना खुल्या व्यासपीठावरुन विधानसभा सेनेकडून निवडणूक लढवीण्याची खुली ऑफर दिली. यावेळी उद्योजक श्रीराम पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी झाली होती. यावेळी उद्योजग राजकीय व्यापारी शासकीय अधिकारी तसेच श्रीराम पाटील यांच्यावर प्रेम करणारे लोक मोठ्या संखेने उपस्थित होते.

 

यांची होती प्रमुख उपस्थिती

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, माफदा अध्यक्ष विनोद तराळ, जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन, जिल्हा परिषद शिक्षण क्रिडा रविंद्र सुर्यभान पाटील, आरोग्य सभापती प्रमोद पाटील, स्वप्निल पाटील, पंचायत समिती सभापती कविता कोळी, नगराध्यक्ष दारा मोहोम्मद, स्वामी शाळेचे अध्यक्ष रविंद्र पवार, डी.डी. बच्छाव, डॉ.संदीप पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, डॉ.गुलाबराव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख योगिराज पाटील, पिपल बँक अध्यक्ष प्रविण पाचपोहे, माजी नगराध्यक्ष शितल पाटील, गोपाल दर्जी, जे.के. पाटील, प्रल्हाद पाटील, विजय गोटीवाले, गोटू शेट हरीषशेट गनवाणी, अशोक शिंदे, यु.डी. पाटील, ज्ञानेश्वर महाजन, रमेश पाटील, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

रुग्णवाहिकाचे लोकार्पण

यावेळी  मतदारसंघातील नागरीकांच्या आरोग्यसाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले तसेच उद्योजक श्रीराम पाटील यांचा लाडूतुला करून रावेर तालुक्यातील वाचनालयांना स्पर्धा परीक्षाचे पुस्तक वाटप करण्यात आले.

संकटकाळात माझ नेहमी सहकार्य- श्रीराम पाटील 

दरम्यान वाढदिवसा निमित्त सत्काराला उत्तर देतांना उद्योजक श्रीराम पाटील म्हणाले की सर्वांगीन विकासासाठी प्रर्यत्नशील असून लवकरच याभागातील युवकांना रोजगार देण्यासाठी एका व्हिजन काम सुरु असून ते पूर्ण झाले की अनेकांना रोजगार मिळेल तसेच रावेर तालुक्यातील शेतक-यांवर जेव्हा जेव्हा नैसर्गिक संकट आले आहे तेव्हा तेव्हा श्रीराम फांऊडेशने मदत केली आहे. आमदार चंद्रकांत पाटलांच्या शुभेच्छा संदेशावर नक्की विचार केला जाणार असल्याचे आश्वासन उपस्थितांना दिला.

 

Protected Content