महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या


छत्रपती संभाजीनगर- वृत्तसेवा । येथे महिला किर्तनकाराच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा भयंकर प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर रोड येथे असणाऱ्या मोहटादेवी आश्रमामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ह. भ. प. संगीताताई महाराज यांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. आश्रमातच संगीताताई महाराज यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करण्यात येत आहे.

दरम्यान या प्रकारामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. सध्या वारी सुरु असतांनाच हा भयंकर प्रकार घडल्याने वारकऱ्यांना धक्का बसला आहे.