सातपुडा वन क्षेत्रात मोल्यवान वृक्षांची तोड

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी तालुक्यातील सातपुडा पर्वतातील वनविभागाच्या प्रादेशिक पश्चिम वनक्षेत्रात अवैधरित्या वृक्षतोड होत असल्याचा प्रकार ग्रामस्थ व स्वराज्य सेनेच्या पुढाकाराने समोर आला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, “तालुक्यातील सातपुडा पर्वतातील वनविभागाच्या प्रादेशिक पश्चिम क्षेत्रात श्रीक्षेत्र मनुदेवीसह परिसरातील वन कक्ष १४७ मध्ये अवैधरित्या मोठया प्रमाणावर मौल्यवान वृक्षांची तोड होत असल्याची माहिती आडगाव कासारखेडा ग्रामस्थ व हिंदवी स्वराज्य सेनेच्या पदाधिकारींना मिळाली. त्यानंतर त्यांच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी थेट सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील जंगल गाठले. वनक्षेत्रात त्या ठिकाणी ते गेले असता शासनाच्या वनक्षेत्रात आडगाव तालुका यावल जवळील मानापुरी आदिवासी वस्तीवरील काही नागरीक अवैधरित्या वृक्षतोड करत असल्याचे त्यांना आढळले. 

हिंदवी स्वराज्य सेनेचे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, प्रदेशाध्यक्ष राहुल पाटील, दीपक पाटील, आडगावातील ग्रामस्थ योगेश पाटील,  प्रशांत पाटील, योगेश कोळी, सिकंदर तडवी, नरेंद्र पाटील आदींनी या नागरीकांना वृक्षतोड करण्यापासून रोखले व वनविभागस ही माहिती देण्यात आली. या पुढे आदीवासी वस्तीवरील नागरीकांनी अवैधरित्या सातपुड्यात वृक्षतोड करू नये अशा सुचना यावेळी देण्यात आल्या आहेत. या पुढे अवैधरीत्या वृक्षतोड केली तर त्यांच्याविरूध्द कठोर कारवाई करण्यात येईल. अशी तंबी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे.”

सातपुड्यात होणारी वृक्षतोड थांबवण्याकरीता आडगाव कासारखेडा ग्रामस्थ व हिंदवी स्वराज्य सेनेकडून घेण्यात आलेल्या पुढाकाराचे वृक्षप्रेमीकडून कौतुक होत आहे. आता या विशाल सातपुडयाच्या कुशीत असलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणावर मोल्यवान वृक्षांची कत्तल होत असल्याची बाब गंभीर असून त्या क्षेत्रात सेवेत कार्यरत असलेल्या वन विभागाच्या अधिकाराऱ्यांना हे कळत नाही का ? असा प्रश्न आता सर्वसामान्य माणूस करू लागला आहे. या सर्व प्रकाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यात यावी. अशी मागणी वृक्षप्रेमी करीत आहे.

Protected Content