Home क्राईम जुन्या वादातून तरूणावर प्राणाघातक हल्ला !

जुन्या वादातून तरूणावर प्राणाघातक हल्ला !

0
156


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जुन्या वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या गंभीर गुन्ह्यात पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी जलद कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक होत आहे. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एका संशयित अटक करण्यात आली.

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून सुमित रूपचंद तंवर वय २० रा. कुऱ्हाड तांडा हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवारी २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सुमितवर जुन्या वादाच्या कारणावरून संशयित आरोपी रणवीर उर्फ मणी सुरेश चव्हाण याच्यासह त्यांचे इतर ५ सहकारी यांनी मारहाण करत जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. कुऱ्हाडीच्या दांड्यासह लाकडी काठ्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात सुमित तंवर हा तरूण गंभीर जखमी झाला. जिवे मारण्याच्या उद्देशाने झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सुमित तंवर याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रणवीर उर्फ मनी सुरेश चव्हाण, सुमित अंकुश राठोड, आकाश शांताराम ठाकरे, दिपक मांगीलाल राठोड, आकाश राजू राठोड, गोपाल ठाकरे सर्व रा. कुऱ्हाड तांडा ता. पाचारो यांच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound